प्रतिनिधी/ बेळगाव
एका अट्टल दुचाकीचोराला अटक करून त्याच्याजवळून पावणे दोन लाख रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी ही माहिती दिली आहे.
इरफान रफिक शेख, रा. वैभवनगर असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. एपीएमसी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या दुचाकी चोरीचा तपास करताना इरफानला अटक करून वेगवेगळ्या ठिकाणी त्याने चोरी केलेल्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक यु. एस. आवटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.









