सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. कॉर्नरसभा ,प्रभाग सभा व घरोघरी प्रचार केला जात आहे. विशाल परब मात्र अपक्ष असूनही पहिल्या टप्प्यातच घरोघरी पोहोचले आहेत. त्यांची एक वेगळी टीम सोशल मीडियावर सातत्याने हटके प्रचार करीत आहे. सोशल मीडियावरील प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबविली जात आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या मनात विशाल परब घर करू लागले आहेत. त्यांच्या एका समर्थ कार्यकर्त्याने अपक्ष उमेदवार विशाल परब यांचा फोटो व त्यांची निशाणी असलेली बाईक रंगवून टाकली आहे. ही बाईक सर्वत्र गावागावात फेरफटका मारत आहे. या बाईकने मतदारसंघाचे लक्ष वेधून घेतले. प्रचाराचा एक आगळावेगळा प्रकार यानिमित्ताने पाहायला मिळाला.









