चानी जाधव यांच्यासह उबाठा सेनेचे कार्यकर्ते भाजपात
कणकवली / प्रतिनिधी
महायुतीचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार नितेश राणे यांनी कणकवली शहरात ठाकरे सेनेला आणखी एक धक्का दिला आहे. ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांचे बंधू चानी जाधव यांच्यासह शिवसैनिकांनी आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश केला. चानी जाधव यांच्यासह राहुल वालावलकर रोशन जाधव यांनीही भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, शिशिर परुळेकर ,अभय राणे , अण्णा कोदे ,विराज भोसले, परेश परब ,सागर राणे आदी उपस्थित होते.









