कोल्हापूर :
निवडणुकांना अखेरचे काहीच दिवस शिल्लक असताना सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देखील कोल्हापुरात महायुतीच्या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे हे देखील कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अंबाबाईचे दर्शन घेऊन ते आदमापुर या ठिकाणी आपली जाहीर सभा घेणार आहेत. तर मुख्यमंत्री हे सुरुवातीला पट्टणकोडोली आणि शिरोळ या ठिकाणी सभा घेणार आहेत आणि त्यानंतर कोल्हापूर शहरामध्ये महायुतीची सभा होणार आहे.या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. आगामी काळात नेत्यांनी प्रचारकाचा धडाका लावला आहे.








