ठाकरे पक्षाचे खा. संजय राऊत यांची टिका
प्रतिनिधी मुंबई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपाचेच मुख्यमंत्री असून ते मोदी आणि शहा हे यांनी महाराष्ट्रावर लादले आहेत. त्यांना मागण्यासाठी सतत दिल्लीला जावे लागते. यापुढेही शिंदे यांना भाजपाच्याच पखाली व्हाव्या लागणार आहे. तसेंच शिंदे यांना भाजपाच्या चपला उचलाव्या लागणार असल्याची टिका ठाकरे पक्षाचे संजय राऊत यांनी केली. शिंदे यांनी मुंबईतील प्रचार कामाला सुऊवात केली असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी मुख्यमंत्री आणि गफहमंत्री यांच्यावर टिका केली.
निवडणूक आयोगाकडून करण्यात येण़ार्या चौकशीला काहीही अर्थ नसल्याचे सांगत संजय राऊत यांनी यापूर्वी हेलिकॉप्टरने पैसे पाठवल्याचे व्हिडीओ, पैसे वाटपाचे व्हिडीओ पाठवले. अनेक पुरावे दिले असल्याचे सांगत चौकशी किंवा कारवाई करण्यात आली नसल्याचे राऊत म्हणाले. तसेच जनतेच्या सुरक्षेचा विचार न करता गफहमंत्री फडणवीस यांनी स्वत:साठी फोर्स वनच्या पूर्ण पथकाचे संरक्षण घेतले असल्याचे राऊत म्हणाले. फडणवीस यांना नेमका कोणापासून धोका आहे? असा प्रश्न उपस्थित करून युक्रेन, इस्रायल, लिबिया, उत्तर कोरियाच्या किंम जोंग यापैकी कोणापासून धोका आहे, ते आम्हाला समजायाला हवे असे विचारत राऊत यांनी फडणवीस यांची खिल्ली उडवली. राज्यात खून ,बलात्कार, खंडणी वसूली, गँगची दहशत असताना गफहमंत्र्यांनी फोर्सवनची सुरक्षा घेतली. त्यांची काळजी आम्हाला देखील वाटते असें ही राऊत म्हणाले. दरम्यान राऊत यांनी बारामतीची लढाईच आता अजित पवारांसाठी सोपी राहिलेली नाही. या निवडणुकीत किंग आणि किंगमेकर कोण होणार हे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच ठरवेल. तसेंच 26 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल. आधी आपण जिंकून या. बारामतीची लढाई आता सोपी राहिलेली नसल्याचा टोला लागवला.









