दरात भरमसाट वाढ : सर्वसामान्य हैराण
बेळगाव : अतिवृष्टीमुळे भाजीपाला दरात भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे दिवाळी सणात महागाईबरोबरच भाजीपाल्याच्या वाढत्या दराचा चटका सहन करावा लागत आहे. सर्वच भाजीपाल्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्य हैराण झाले आहेत. बाजारात प्रति किलो ढबू मिरची 80 रु., गवार 80 रु., भेंडी 90 रु., वांगी 100 रु., गाजर 60 रु., दोडकी 60 रु., कारली 60 रु., टोमॅटो 30 रु. यासह कोथिंबीर 30 रु. पेंडी, मेथी 50 रु. 2 पेंडी, शेपू 30 रु. 2 पेंडी, पालक 20 रु. 3 पेंडी, फ्लॉवर 30 रु. 1, कोबीज 20 रु. 1, अल्ले 160 रु. असे दर आहेत. पावसामुळे भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बाजारात नवीन भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. परिणामी भाजीचे दर गगनाला भिडले आहेत. ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना भाजीपाल्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.









