वार्ताहर /मजगाव
मजगाव शेतवडीच्या हद्दीतील 5 वे रेल्वेगेट दुरुस्तीच्या नावाखाली अद्याप बंदच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हाताने उचलूनच गेट बाजूला करून रस्ता पार करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून वरील गेट दुरुस्त करावा, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. सध्या सुगीचे दिवस असल्याने शेताकडे वाहनाद्वारे जाणे म्हणजे कसरतीचे झाले आहे.









