शिवसेनेचे आवाहन
बेळगाव : काळ्यादिनी संपूर्ण सीमाभागात हरताळ पाळून मोठ्या संख्येने शिवसैनिक मूक सायकल फेरीमध्ये सहभागी होण्याचा निर्धार बेळगाव जिल्हा शिवसेना (सीमाभाग) बैठकीत करण्यात आला. नुकतीच रामलिंगखिंड गल्ली येथील मुख्य कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, समिती नेते शुभम शेळके, सचिन गोरले, दिलीप बैलूरकर, राजकुमार बोकडे, महेश टंकसाळी, दत्ता पाटील, विनायक बेळगावकर, राजू कणेरी, रमेश माळवी, विनायक हुलजी यांच्यासह इतर उपस्थित होते.









