मुंबई :
बांधकाम क्षेत्रातील कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज यांनी हल्लीच सहा जागा खरेदी केल्या असल्याचे समजते. कंपनीने सदरच्या जागा खरेदी केल्या असून याकरिता 9650 कोटी रुपये मोजले असल्याचेही सांगितले जात आहे. बांधकाम क्षेत्रातील ही आघाडीवरची कंपनी म्हणून पुढे येत असून मुंबईसह विविध शहरांमध्ये त्यांचे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. दिल्ली-एनसीआर आणि बेंगळूरमध्ये सुद्धा कंपनीने आपले प्रकल्प राबवले आहेत. कंपनीने सदरच्या 6 जागा अलीकडेच खरेदी केल्या आहेत. जागा मालकासोबत संयुक्त विकासाच्या माध्यमातूनही कंपनी प्रकल्पाच्या विकासाचे काम हाती घेणार आहे. पहिल्या 6 महिन्यांमध्ये पाहता कंपनीने एकंदर आठ जागांचे व्यवहार केले आहेत.









