नवी दिल्ली:
सध्याला शेअरबाजारात पडझडीचे सत्र सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या विदेशी चलन साठ्यातही घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. 18 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात भारताचा विदेशी चलन साठा 2.16 अब्ज डॉलर्सने कमी होत 688.267 अब्ज डॉलर्सवर घसरला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी ही माहिती दिली आहे.
याआधीच्या आठवड्यातही विदेशी चलन साठ्यात 10.75 अब्ज डॉलर्सची घसरण झाली होती. पण 18 ऑक्टोबरच्या आठवड्यातील घसरण ही सर्वात मोठी मानली जात आहे. तसेच एकूण विदेशी चलन साठ्याची ही नीचांकीही मानली जात आहे.









