पाण्यावर थाटलेले गाव
कार आणि बाइक्सचा गोंगाट नसलेल्या ठिकाणी प्रत्येक घर एका कालव्याच्या काठावर तयार झालेले असेल आणि ये-जा करण्यासाठी नौकांचा वापर होत असेल असा ठिकाणाची कल्पना करून पहा. एखाद्या चित्रपटातील दृश्य असल्याचे वाटू लागले. परंतु प्रत्यक्षात एका ठिकाणी हे खरोखरच अस्तित्वात आहे.
नेदरलँडच्या गीएथूर्न गावाला जगातील सर्वात अनोखे गाव म्हणून ओळखले जाते. याला नेदरलँडचे व्हेनिस असेही संबोधिले जाते. या गावाचे सौंदर्य अदभूत आहे. हे अत्यंत शांत गाव म्हणूनही ओळखले जाते. हे गाव प्रत्यक्षात पाण्यावर वसलेले आहे. तेथे चहुबाजूला पाणीच पाणी आहे. अशा स्थितीत गावात एखाद्या व्यक्तीला कुठे जायचे झाल्यास त्याला नौकेची मदत घ्यावी लागते.
गावात काही ठिकाणी लाकडाचे पूल निर्माण करण्यात आले असून त्याद्वारे कालव्यांना ओलांडले जाऊ शकते. या गावाची स्थापना 1230 मध्ये झाली होती आणि प्रारंभी या गावाचे नाव गेटेनहोर्न होते. येथे जगभरातील पर्यटक येत असतात. हे गाव 800 वर्षे जुने असून ते पूर्णपणे पाण्यावर वसलेले आहे. या गावात रस्ते नाहीत तसेच गावातील कुठल्याही व्यक्तीकडे कार किंवा बाइक नाही.









