राष्ट्रीय महामार्गावर एम. के. हुबळीनजीकची घटना
प्रतिनिधी/ बेळगाव
अज्ञात वाहनाच्या ठोकरीने निवृत्त जवानाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवार दि. 25 ऑक्टोबर रोजी सकाळी एम. के. हुबळी येथे ही घटना घडली आहे. अपघातानंतर वाहनचालकाने आपल्या वाहनासह पलायन केले आहे.
माधव जिवाजी कुलकर्णी (वय 63), रा. बसवनगर, एम. के. हुबळी असे या दुर्दैवी माजी सैनिकाचे नाव आहे. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी माधव फिरायला गेले होते. त्यावेळी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या ठोकरीने जागीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच कित्तूरचे पोलीस निरीक्षक शिवानंद गुडगनट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. कित्तूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.









