भारतीय जनता पार्टीत इनकमिंग वाढले
कणकवली / प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून भारतीय जनता पार्टीत इनकमिंग वाढले आहे. तालुक्यातील साळीस्ते ताम्हणकरवाडी येथील ग्रा.प. सदस्य हर्षदा ताम्हणकर, ग्रा.प. सदस्य तेजल पवार, लक्ष्मी ताम्हणकर, समीर ताम्हणकर, जयश्री ताम्हणकर, संगीता ताम्हणकर, संजय ताम्हणकर, सचिन ताम्हणकर, नरेंद्र ताम्हणकर, संतोष ताम्हणकर, प्रदीप ताम्हणकर, प्रियांका ताम्हणकर, प्रथमेश ताम्हणकर, निखिल ताम्हणकर, अभिजित ताम्हणकर, मंदा ताम्हणकर यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, संतोष कानडे, बाळा जठार, नाना शेट्ये, राजा जाधव, नामदेव जाधव आदि उपस्थित होते.









