नवी दिल्ली :
एस. परमेश यांनी मंगळवारी भारतीय तटरक्षक दलाचे नवे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. मागील तीन दशकांमध्ये दलात अनेक पदांवर त्यांनी काम केले आहे. नवी जबाबदारी सांभाळण्यापूर्वी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. तटरक्षक दलाच्या महासंचालकाचा पदभार सांभाळणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. ही जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडू इच्छितो असे परमेश यांनी म्हटले आहे.









