सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर यांच्या मातोश्री श्रीमती शालिनी गोपाळ अरविंदेकर (92 वर्षे )यांचे शुक्रवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर उपरलकर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.









