सावंतवाडी प्रतिनिधी
वैश्यवाडा हनुमान मंदिर उत्सव समिती सावंतवाडी यांच्यावतीने बुधवार 16 ऑक्टोंबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हनुमान मंदिर वैश्यवाडा येथे सायंकाळी ठीक सात वाजता कुडाळ येथील ह. भ. प . श्री. अवधूत बुवा धुपकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. सदर कीर्तनाला तबला साथ निरज भोसले ,संवादिनी साथ मंगेश मेस्त्री करणार आहेत . तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वैश्यवाडा युवक कला क्रीडा मंडळ तर्फे करण्यात आले आहे.









