सावंतवाडी । प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने राज्यातील 108 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नावात बदल करून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती तसेच समाजसुधारकांची नावे देण्याचा शासन निर्णय जाहीर केल्या असून सावंतवाडी तालुक्यातील कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोलगाव सावंतवाडीस , ज्येष्ठ समाजवादी नेते, स्वातंत्र्यसेनानी , माजी आमदार स्वर्गीय जयानंद मठकर यांचे नाव देण्यात आले आहे. माजी आमदार ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर यांनी कोकण रेल्वेसाठी लढा दिला. कोकणातील सामाजिक आणि विकासात्मक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. त्यांचे नाव आज सावंतवाडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस दिल्याने ही समस्त सावंतवाडीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.









