कोलकाता :
पश्चिम बंगालच्या कोलकात्यात आरजी कर रुग्णालयात महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या झाल्यावर निर्माण झालेला वाद अद्याप शमलेला नाही. रुग्णालयाच्या ज्युनियर डॉक्टरांचे उपोषण सुरू झाले आहे. त्यांच्या समर्थनार्थ मंगळवारी 50 वरिष्ठ डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. ज्युनियर डॉक्टर्स फ्रंट महिला डॉक्टरसाठी न्याय आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना हटविण्याच्या मागणीवरून उपोषण करत आहेत.









