कोकण रेल्वे एम्प्लॉईज संघाचे अध्यक्ष मिलिंद तुळसकर यांच्या फोटोला काळे फासत जोरदार घोषणबाजी
कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कोकण रेल्वे एम्प्लॉईज संघाचे अध्यक्ष मिलिंद तुळसकर यांच्या फोटोला काळे फासत रत्नागिरी रेल्वेस्थानकाबाहेर कामगार सेनेने जोरदार आंदोलन करीत जाहीर निषेध केला.
कोकण रेल्वे एम्प्लॉईज संघाचे अध्यक्ष मिलिंद तुळसकर यांनी एका मेळाव्यात शिवसैनिक आणि रेल कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांविषयी असंविधानिक शब्द वापरण्याचा आरोप करत रेल कामगार सेनेने मिलिंद तुळसकर यांच्या विरोधात रत्नागिरी रेल्वे स्टेशन बाहेर जोरदार आंदोलन केले आणि त्यांच्या फोटो ला काळे फासले.
या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख बंड्या साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद सावंत, रेल कामगार सेनेचे जनरल सेक्रेटरी राजीव सुरती, कार्याध्यक्ष विलास खेडेकर, खजिनदार विश्वास राणे, गजानन गायकर, दत्ता तेलंगे, तेजस थिटे, शशी नायर, राजेंद्र ठाकूर, चंदन गुरव आदी उपस्थित होते.