वार्ताहर/जांबोटी
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ओलमणी शाखेच्या वतीने गुरुवारपासून ओलमणी येथे दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले. या दौडीला गावातील युवा वर्गांचा तसेच बालचंमुचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. या दौडीमुळे युवा वर्गामध्ये नवचैतन्य पसरले आहे. गुरुवार दि. 3 रोजी सकाळी 5.30 वाजता मारुती मंदिरपासून या दौडीला प्रारंभ करण्यात आला. ग्रा. पं. सदस्य अशोक सुतार यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पूजन तसेच सदस्या लक्ष्मी मादार यांच्या हस्ते दुर्गादेवी प्रतिमा पूजन, गोवा येथील उद्योजक महेश नाईक यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन व किरण साबळे, प्रभाकर साबळे यांच्या हस्ते शस्त्रपूजन करून दौडीचा शुभारंभ झाला. मारुती मंदिरपासून दौडीला प्रारंभ होऊन विविध गल्ल्यांतून फिरून मंदिरात सांगता करण्यात येत आहे.









