► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या प्रमुखपदी निवृत्त आयपीएस अधिकारी शरद कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर माहिती बीसीसीआयच्या प्रवक्त्याने दिली.
शरदकुमार हे उत्तर प्रदेशमधील बरेलीचे रहिवाशी असून त्यांना या क्षेत्रातील मोठा अनुभव आहे. 68 वर्षीय शरद कुमार यांची यापदासाठी 4 वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. आता ते हा या नव्या पदाची सुत्रे लवकरच हाती घेतील. हरियाणाच्या 1979 सालातील आयपीएस केडरमधील ते सदस्य आहेत. 2013 ते 2017 या कालावधीत शरद कुमार हे राष्ट्रीय तपास संघटनेचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.









