वृत्तसंस्था/ चेन्नई
सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना गुरुवारी रात्री 11 वाजता अपोलो ऊग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रजनीकांत यांना 30 सप्टेंबर रोजी चेन्नईच्या अपोलो ऊग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या हृदयातून निघणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीला सूज आली होती. या प्रकृती अस्वास्थ्यावर ट्रान्सपॅथेटर पद्धतीने उपचार करण्यात आले. हॉस्पिटलचे वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट साई सतीश यांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यांच्या महाधमनीमध्ये स्टेंट बसवल्यामुळे सूज पूर्णपणे कमी झाल्यानंतर त्यांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला. पुढील काही दिवस त्यांना घरीच आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.









