सर्पमित्र बंटी नाईक यांनी घोडेमुख येथील जंगल अधिवासात केले मुक्त
न्हावेली / वार्ताहर
न्हावेली पार्सेकरवाडीकडे येथे जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे १२ फुटी अजगर निदर्शनास आला. याची माहिती सर्पमित्र बंटी नाईक यांना देण्यात आली. बंटी नाईक हे लगेच त्या ठिकाणी दाखल होत अजगरला पकडून त्याला घोडेमुख येथील जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.मागील काही दिवसांपासून हा अजगर अनेक वेळा ग्रामस्थांच्या निदर्शनात पडत होता. रात्रीच्यावेळेस अजगर निदर्शनात पडत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.यावेळी सर्प मित्र बंटी नाईक, आनंद आरोंदेकर, प्रसाद आरोंदेकर, प्रशांत आरोंदेकर, प्रथम आरोंदेकर, सोनू आरोंदेकर, तुकाराम पार्सेकर, श्रेयस पार्सेकर हे सहकार्यास होते. सर्प मित्र बंटी नाईक यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.









