चेन्नई
सुपरस्टार रजनीकांत यांना 30 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू होता असे सांगण्यात येत आहे. रजनीकांत यांच्यावर मंगळवारी एक शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे समजते. रुग्णालयाच्या सूत्रांकडून रजनीकांत यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. रजनीकांत याची प्रकृती आता बरी असल्याची माहिती त्यांच्या पत्नी लता यांनी दिली आहे.









