वृत्तसंस्था / मुंबई
चालू वर्षाच्या अखेरीस भारतात तीन शहरांमध्ये खेळविल्या जाणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धेत माजी कसोटीवीर सचिन तेंडुलकर सहभागी होणार आहे. ही स्पर्धा टी-20 प्रकाराची असून सहा संघांचा यामध्ये समावेश राहिल.
इंटरनॅशनल मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, विंडीज, इंग्लंड आणि लंका येथील क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धा मुंबई, लखनौ आणि रायपूरमध्ये खेळविली जाईल. या स्पर्धेमुळे देशातील क्रिकेट शौकिनानां वयस्कर क्रिकेटपटूंचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे.









