नवी दिल्ली :
देशाच्या विदेशी चलन साठ्यामध्ये 2.84 अब्ज डॉलरची वाढ झाली असून सदरचा विदेशी चलन साठा 692.30 अब्ज डॉलर्स या विक्रमी उंचीवर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व बँकेने या संदर्भातली माहिती दिली आहे. 20 सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात सलग सहाव्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठा वाढलेला दिसून आला आहे. या आधीच्या 5 आठवड्यांमध्ये विदेशी चलन साठा 19.3 अब्ज डॉलर्सने वाढला होता. 13 सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यामध्ये देशाचा विदेशी चलन साठा 22.3 कोटी डॉलर्सने वाढून 689.46 अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता. 20 सप्टेंबरच्या आठवड्यामध्ये देशाचा सुवर्ण साठा 72.6 कोटी डॉलर्सने वाढून 63.61 अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया मात्र तेजीत पाहायला मिळाला.









