कासेगाव राज्यात तृतीय तर येळावी ग्रामपंचायत विभागात प्रथम; जिल्ह्याला 9 कोटी 20 लाखांचे बक्षीस
सांगली प्रतिनिधी
माझी वसुंधरा आ†भयान 4.0 अंतर्गत जिल्हा परिषद सांगलीचा राज्यात प्रथम क्रमांक आला असून जिल्हा परिषद सांगली अंतर्गत 16 ग्रामपंचायतीनी देखील यश मिळवले आहे. तर दहा हजाराच्या वर लोकसंख्या असणाऱ्या गटात वाळवा तालुक्यातील कासेगाव ग्रामपंचायतीचा राज्यात तिसरा क्रमांक आला असून तासगाव तालुक्यातील येळावी ग्रामपंचायतीचा विभागात नंबर आला आहे.
पृथ्वी वायु जल अग्नि आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंच तत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन ऑक्टोबर 2020 राबवण्यास सुरूवात झाली. माझी वसुंधरा अभियान चार हे एक एप्रिल 2023 ते दिनांक 31 मे 2024 कालावधीत राबवण्यात आले. यामध्ये सांगली जिल्हा परिषदेकडील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला.
पाच ते दहा हजार लोकसंख्या गटात वाळवा तालुक्यातील येडानिपाणी ग्रामपंचायतचा राज्यात प्रथम क्रमांक आला असून वाळवा तालुक्यातील वाटेगाव ग्रामपंचायत राज्यस्तरावर उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले. तसेच मिरज तालुक्यातील समडोळी ग्रामपंचायतीलाही देखील उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले. पलूस तालुक्यातील वसगडे ग्रामपंचायत विभागातील बक्षीस मिळाले. अडीच ते पाच हजार लोकसंख्या गटात कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे ग्रामपंचायत राज्यात प्रथम क्रमांक आला असून विभागात कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव व घाटनांद्रे ग्रामपंचायतीस बक्षीस प्राप्त झाले आहे.
दीड ते अडीच हजार लोकसंख्या गटात कवठेमहांकाळ तालुक्यातील लंगरपेठ या ग्रामपंचायत राज्यस्तरावर उत्तेजनार्थ तसेच विभागात बनेवाडी व खंडोबाची वाडी ग्रामपंचायत बक्षीस प्राप्त झाले आहे. दीड हजारपेक्षा खालील लोकसंख्या गटात जिल्ह्यातील कुंडलापूर व कौलगे ग्रामपंचायतीस विभागातील बक्षीस प्राप्त झाले आहे जिल्हा परिषद सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडामिसे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, ऑपरेटर यांनी ग्रामपंचायतींनी यशस्वी कामा†गरी केल्याने हे यश मिळाले. या यशाबद्दल कौतुक होत आहे.
जिल्ह्याला नऊ कोटी वीस लाखाचे बक्षीस
या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींना सुमारे नऊ कोटी 20 लाख रूपये बक्षीस मिळणार आहे, यामध्ये कासेगावला एक कोटी 25 लाख, नांगोळे एक कोटी, वाटेगाव 75 लाख, समडोळी 75 लाख, येडेनिपाणी एक कोटी पाच लाख, बनेवाडी, लंगरपेठ, बोरगाव प्रत्येकी 50 लाख, घाटनांद्रे, खंडोबाचीवाडी, वसगडे, नागठाणे, कवलापूर, येळावी, कुंडलापूर, कौलगे प्रत्येकी 15 लाख रूपयांचे बक्षीस मिळणार आहे.