संजयकाकांसह सहा कार्यकर्त्यांविरोधात फिर्याद; राष्ट्रवादीच्या मुल्लांच्या विरोधातही गुन्हा दाखल : आज कवठेमहांकाळमध्ये मोर्चा
कवठेमहांकाळ प्रतिनिधी
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्या गटाविरूध्द काम केल्याचा राग मनात ठेवून माजी खासदार संजयकाका पाटील व त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ( शरदचंद्र पवार) कवठेमहांकाळ शहरातील कार्यकर्ते आणि माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुला यांना घरात घुसून मारहाण केली. तसेच यावेळी पाटील व त्यांच्या समर्थकांनी मुला यांच्या घरातील इतर महिला व मुलांनाही मारहाण केली. मुला यांना वाचवायला आलेल्या त्यांच्या 76 वर्षीय आईलाही स्वत: पाटील यांनी ढकलून दिले. त्यामुळे अय्याज सय्यद मुला यांनी पोलिसात तक्रार दिल्याने संजयकाका पाटील, खंडू होवाळे यांच्यासह 4 ते 5 अनोळखी व्यक्तीं विरूध्द कवठेमहांकाळ पाोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, खंडू होवाळे यांना जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या प्रकरणात अय्याज मुल्ला, पिंटू कोळेकर व इतरांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
या मारहाण घटनेचे पडसाद शुक्रवारी उमटल्याने या घटनेनंतर पाटील यांच्यावर कारवाई व्हावी यामागणीसाठी आमदार सुमनताई पाटील व रोहित पाटील यांनी स्वत: पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला. त्यांच्यासमवेत कवठेमहांकाळ व तासगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. या मारहाण प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सकाळी साडेसातच्या सुमारास अय्याज मुला हे फेरफटका मारून घरासमोर बसले होते. यावेळी संजयकाका पाटील यांचे पीए खंडू होवळे हे मुला यांच्या घरी आले व संजयकाका भेटायला येणार असल्याचे सांगितले. मुला यांनी काका घरी येणार असल्याने घरी चहा करायला सांगितला. तोपर्यंत दारात दोन-तीन गाडी येऊन थांबल्या. एम एच 10 डी एक्स 4004 या गाडीमधून माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यासह दहा-पंधरा जण उतरले. त्यांनी थेट घरात घुसून अय्याज मुला यांना मारहाण करायला सुरवात केली.
फिर्यादी मुल्ला यांना जोरजोरात शिवीगाळ केली, तसेच फिर्यादी अय्याज मुल्ला यांचा मुलगा कैफ, पुतण्या एजाज व अनिस तसेच मुला यांच्या आई हाजराबी हे घराच्या हॉलमध्ये आले असता यांनाही माजी खासदार पाटील यांनी स्वत: व चार ते पाच अनोळखी इसमांनी मारहाण केली तसेच मुला यांच्या आईलाही त्यांनी ढकलून दिले तसेच तू भविष्यात कसा जिवंत राहतो, असे बोलून जिवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी माजी खासदार पाटील यांच्यासह खंडू होवाळे व चार ते पाच जणांविरूद्ध 189(2), 352, 351, 333, 115(1), 115(2) या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे तर घटनेचा तपास सपोनि दत्तात्रय कोळेकर हे करत आहेत.
माजी खासदार संजयकाका पाटील आा†ण त्यांच्या समर्थकांनी माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुला यांना घरात घुसून मारहाण केल्याची बातमी आमदार सुमनताई पाटील, रोहीत पाटील, जि. म. बँकेचे संचालक सुरेश पाटील यांना कळताच त्यांनी कवठेमहांकाळ गाठले आणि मुल्ला यांना झालेल्या मारहाणप्रकरणी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते पोलीस स्टेशनच्या आवारात जमले.
जोपर्यंत मुला यांना मारहाण करण्यांविरूध्द गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलिस स्टेशन सोडणार नाही, लोकशाहीच्या चौकटीत राहून आंदोलन करू, अशी भुमिका घेतली. पोलिसांनी फिर्याद घेतो. आपण पा†लस स्टेशनमध्ये बसावे, असे आवाहन केले मात्र गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही, अशी भुमिकाही घेतल्याने पोलिसांनी मुल्ला यांना फिर्याद देण्यास सांगितले.
माजी खासदार पाटील हे कवठेमहांकाळ तालुक्यात दहशत माजवून जनता व कार्यकर्त्यांना वेठीस धरीत असतील तर लोकशाही मार्गाने आम्ही लढा उभारू असा इशारा आ. सुमनताई पाटील यांनी दिला. माजी खासदार संजयकाका पाटील यांनी एखाद्या कार्यकर्त्याच्या घरात घुसून वृध्द महिला व मुलांना मारहाण करून लोकशाहीचा मुडदा पाडला आहे. ही गुंडगिरी कायद्याच्या मार्गाने मोडून काढू, असा इशारा रोहीत पाटील यांनी दिला. कवठेमहांकाळमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आम. सुमनताई पाटील, रोहीत पाटील व सुरेश पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते पोलिस स्टेशनकडे धावून आले.
कवठेमहांकाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय पाटील, तासगावचे अध्यक्ष विश्वास पाटील, युवराज पाटील, सतिश पवार, अमोल पाटील, अॅड. गजानन खुजट, प्रविण पवार, रविंद्र पाटील, अरूण पवार, अमोल शिंदे, रोहीत कलढोणे, महेश पवार, दादासाहेब कोळेकर, बाळासाहेब पाटीव, अमर शिंदे, राहुल जगताप, महेश पाटील, दिलीप पाटील, विक्रांत पाटील, शिवाजी कदम, सम्राट भोसले, अर्जुन गेंड, नितीन पाटील, अभिजित पाटील, संभाजी पाटील, बाबासाहेब वाघमारे, हायुम सावनुरकर, झैरूद्दीन सावनुरकर, गणेश पाटील, ताजुद्दीन तांबोळी, सा†नल हुबाले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डीवायएसपी सा†नल साळुंखे, पा†लस निरीक्षक जोतिराम पाटील हे दिवसभर कवठेमहांकाळ पाोलिस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसले होते. माजी खासदार संजयकाका पाटील यांनी अय्याज मुला यांना केलेल्या मारहाणप्रकरणी उद्या शनिवार 28 रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आम. सुमनताई पाटील व रोहीत पाटील यांनी केले आहे.
बाजार समितीचे माजी सभापती दादासाहेब कोळेकर व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनाही माजी खासदार संजय पाटील यांनी फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे माजी खासदारांकडून आमच्या व आमच्या परिवाराच्या जीवाला धोका आहे. आम्हाला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी दादासाहेब कोळेकर व बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.