उंदरांची अनोखी प्रजाती ऑस्ट्रेलियात
छोटे मार्सूपियल्स म्हणजेच अत्यंत छोट्या उंदरांचा एक जीनस आहे आंटेचिनस. हे उंदिर ऑस्ट्रेलियात आढळून येतात. या जीनसमध्ये येणाऱ्या सर्व प्रजातींच्या उंदरांचे नशीब वाईट आहे, खासकरून नराचे. हे नर उंदिर केवळ मादी उंदिराला गर्भवती करण्यासाठी जन्माला येत असतात. हे काम पूर्ण होताच त्यांचा जीव जात असतो.
नर उंदिर मृत्युमुखी पडल्यावर मादी उंदिरच त्याचा मृतदेह फस्त करत असते. भविष्यात पिल्लांना जन्म देण्यासाठी ऊर्जा मिळावी म्हणून हे मादी उंदिर करत असते. हे उंदिर सर्वसाधारणपणे किडे, सेंटीपीड्स आणि कधीकधी छोटया बेडकांनाही खात असतात. आंटेचिनसमध्ये जितक्या प्रजातींचे नर उंदिर आहेत, त्यांचे वैशिष्ट्या म्हणजे त्यांच्या शरीराचे अवयव निकामी होतात आणि यातच त्यांचा मृत्यू होत असतो.
आंटेचिनसमध्ये उंदरांच्या 15 अशा प्रजाती आहेत, ज्यात सर्व नरांसोबत हेच घडते. नर आणि मादी एकत्र आल्यावर नर स्वत:ची झोप त्यागत असतो. त्यानंतरच थकवा आणि तणावामुळे त्याचा मृत्यू होतो. टेस्टोस्टेरॉन आणि कॉर्टीसॉलची पातळी अत्यंत अधिक असते. टेस्टोस्टेरॉन कॉर्टीसोलला काम करण्यापासून रोखतो, अशा स्थितीत अवयव निकामी होत असतात.
क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीच्या सस्तन जीवनांच्या इकोलॉजिस्ट डायना फिशर यांच्यानुसार काही उंदिर बचावतात, परंतु ते अत्यंत दुर्लभ असते. अशा प्रकरणांमध्ये नर स्पर्म तयार करणे बंद करत असतो. याचमुळे तो बचावतो. परंतु त्यानंतर तो कधीच रिप्रॉडक्शन करू शकत नाही. या उंदरांचे स्पर्म एपिडिडिमिस नावाच्या अवयवात लपलेले असतात.