वृत्तसंस्था/नवी दिल्ली
मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या जामीन याचिकेवर ईडीने विशेष सीबीआय न्यायालयात उत्तर दाखल केले. विशेष सीबीआय न्यायाधीश राकेश सियाल यांनी जैन यांच्या वकिलाला युक्तिवाद करण्यासाठी वेळ दिला. सत्येंद्र जैन यांच्यावतीने वकील विवेक जैन यांनी हजेरी लावली आणि तासाभरापूर्वीच उत्तर मिळाल्याचे न्यायालयाला सांगितले. यासंबंधी आता पुढील सुनावणी 5 ऑक्टोबरला होणार आहे. ईडीने सत्येंद्र जैन यांना मे 2022 मध्ये मनी लाँड्रिग प्रकरणात अटक केली होती. त्यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.









