पुंछ
जम्मू-काश्मीरच्या पुंछ येथील मेंढर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर सैनिकांनी पाकिस्तानी घुसखोराला ताब्यात घेतले आहे. रविवारी पकडण्यात आलेल्या या घुसखोराचे नाव हसम शहजाद असून तो पाकव्याप्त काश्मीरमधील तारिनोत गावचा रहिवासी आहे. मेंढरच्या कृष्णा घाटी सेक्टरमधून भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न त्याने केला होता. गस्त पथकाला भारतीय क्षेत्रात 100 मीटर आत ब्रावो चेकपोस्टनजीक शहजाद लपलेला आढळून आला होता. शहजादकडून 1800 पाकिस्तानी रुपये, एक ओळखपत्र आणि दोन सिमकार्ड्स हस्तगत करण्यात आली आहेत. आपण चुकून नियंत्रण रेषा ओलांडल्याचा दावा शहजादने चौकशीदरम्यान केला आहे.









