प्रतिनिधी/ बेळगाव
रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे राष्ट्रनिर्माता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दर्पणने 2024-25 वर्षांतर्गत दत्तक घेतलेल्या मण्णूर येथील चार शिक्षकांचा गौरव करण्यात आला. सुजाता नावगेकर, आशा पोतदार, राजश्री तुडयेकर, सुनंदा मजुकर यांचा यामध्ये समावेश आहे. यावेळी प्रिती चौगुले, कलमेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक वाय. के. नाईक, रोटरी क्लब दर्पणचे सचिव शीतल चिलमी, डॉ. स्मृती प्रधान उपस्थित होत्या. कार्यक्रमाला रोटरीचे पदाधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते.









