वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे उपराज्यपाल (एलजी) विनय कुमार सक्सेना यांनी बुधवारी अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला. नवे मुख्यमंत्री आतिशी यांच्या शपथविधीसाठी शनिवार, 21 सप्टेंबर या तारखेचा प्रस्तावही त्यांनी राष्ट्रपतींकडे पाठवला आहे. 17 सप्टेंबर रोजी आप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. यानंतर केजरीवाल यांनी संध्याकाळी उपराज्यपाल सक्सेना यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. आतिशी यांनी दिल्लीत नवे सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तसेच शपथविधीची तारीख निश्चित करण्याची मागणी उपराज्यपालांकडे केली. दिल्ली सरकारने 26 आणि 27 सप्टेंबरला विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन बोलावले आहे.









