वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूर सरकारने हिंसाचारग्रस्त 5 जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट बंदी वाढवली आहे. इंफाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, थौबल, बिष्णुपूर आणि काकचिंगमधील लोक 20 सप्टेंबरपर्यंत मोबाईल इंटरनेट वापरू शकणार नाहीत. वास्तविक, मणिपूरमध्ये हिंसक घटनांमध्ये अचानक वाढ झाल्यानंतर राज्य सरकारने 10 सप्टेंबर रोजी 5 दिवस इंटरनेटवर बंदी घातली होती. मात्र, 12 सप्टेंबर रोजी ब्रॉडबँड इंटरनेटवरील बंदी उठवण्यात आली. येथे दहशतवाद्यांनी मंत्री काशीम वाशुम यांच्या उखऊल निवासस्थानावर ग्रेनेड हल्ला केला. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. वशुम हे नागा पीपल्स फ्रंटचे आमदार आहेत.









