बेळगाव : नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर शास्त्राrनगर येथील ज्ञान मंदिर शाळा आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या शहापूर माध्यमिक विभागीय अॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धेला मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला. उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पीईओ जहिदा पटेल, ज्ञानमंदिर शाळेचे सचिव संजीव नेगीनहाळ, जयदीप देसाई, जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष आर. पी. वंटगुडी, एल. बी. नाईक, नामदेव पाटील, माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव उमेश कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका अलका जाधव, स्पर्धा सचिव बापू देसाई, नामदेव पाटील, सीआरपी संतोष खेमजी, गानगेर, एम. के. पाटील, माऊती डी. उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडाध्वजारोहण करण्यात आले. खेळाडू पार्थ चतुर, प्रेम होनगेकर,शुभम पाटील यांनी मैदानाभोवती क्रीडाज्योत फिरून पाहुण्यांकडे सुपूर्द केले. खेळाडू आराध्याने सहभागी खेळाडूंना शपथ देवविली. यानंतर पाहुण्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन पर भाषणे केली. सूत्रसंचालन शितल पाटील तर फरीदा मिर्झा यांनी आभार मानले. याप्रसंगी शहापूर विभागातील सर्व माध्यमिक शालेय क्रीडा शिक्षक व सहाय्यक शिक्षक उपस्थित होते.
Previous Articleराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कराटेपटूंची निवड
Next Article मराठी विद्यानिकेतनला खो-खो स्पर्धेत दुहेरी मुकुट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









