ओटवणे । प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील केसरी येथे शरद नारकर यांच्या फार्मवर पर्पल ट्री क्रब जातीचा निळ्या रंगाचा दुर्मिळ खेकडा सापडला असून हा खेकडा झाडावर राहाणारा खेकडा आहे. याचे वैज्ञानिक नाव ghatiana atropurpurea घाटीयांना अॅट्रोपरपुरीया असे आहे. हा खेकडा झाडाच्या ढोलीमध्ये साठलेल्या पाण्यात दिवसाचा राहातो.रात्री ढोलीतुन बाहेर येऊन अन्नाच्या शोधात बाहेर फिरतो . तसेच हा खेकडा विषारी समजला जातो त्यामुळे याला खात नाहीत अशी माहिती डॉ गणेश मर्गज यांनी दिली . तर हा दुर्मिळ खेकडा पर्पल ट्री क्रब जातीचा असल्याची माहिती सुभाष पुराणिक यांनी दिली.









