वृत्तसंस्था/लिमा
पेरूचे माजी राष्ट्रपती अल्बर्टो फुजिमोरी यांचे वयाच्या 86 व्या वषी गुरुवारी निधन झाले. त्यांना कर्करोग झाला होता. बुधवारी त्यांच्या मृत्यूची घोषणा त्यांची मुलगी केको फुजिमोरी यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टद्वारे केली. ते 2026 मध्ये होणारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याची माहिती त्यांच्या मुलीने जुलै 2024 मध्ये दिली होती. ते चालू वर्षाच्या प्रारंभापर्यंत तंदुरुस्त होते. मात्र, कर्करोगाने ग्रासल्याने गेल्या काही दिवसांमध्ये त्यांची प्रकृती फारच नाजूक झाली होती. अखेरीस गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.









