वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काश्मीरच्या बारामुल्ला मतदारसंघाचे लोकसभा खासदार इंजिनियर रशीद बुधवार, 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी तिहार कारागृहामधून बाहेर पडले. 10 सप्टेंबर रोजी दिल्ली न्यायालयाने त्यांना 2 ऑक्टोबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. इंजिनियर रशीदला 2016 मध्ये युएपीए अंतर्गत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी फंडिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2019 पासून इंजिनियर रशीद तिहार तुऊंगात बंद होते. खोऱ्यातील दहशतवादी गट आणि फुटीरतावाद्यांना निधी पुरवल्याच्या आरोपाखाली एनआयएने अटक केलेल्या काश्मिरी व्यापारी जहूर वतालीच्या तपासादरम्यान रशीद यांचे नाव समोर आले होते. इंजिनियर रशीद तुऊंगात असताना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते.









