वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने बुधवारी खलिस्तान समर्थक कट्टरवादी गट ‘शीख फॉर जस्टिस’वरील बंदी पुढील 5 वर्षांसाठी वाढवली आहे. युएपीए अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ‘शीख फॉर जस्टिस’ (एसएफजे) आणि अमेरिकन नागरिक गुरपतवंत सिंग पन्नू यांच्याविऊद्ध सहाहून अधिक खटले दाखल केले आहेत. गेल्यावषी एजन्सीने त्याच्या पंजाब आणि चंदीगडमधील मालमत्ताही ताब्यात घेतल्या होत्या. यापूर्वी, भारत सरकारने जुलै 2019 मध्ये शीख फॉर जस्टिसवर बंदी घातली होती. त्यानंतर यावषी ही बंदी वाढवण्यात आली आहे.









