कै . शिवाली पडवळ हिच्या प्रथम स्मृतीदिनाचे औचित्य
ओटवणे प्रतिनिधी
डेगवे येथील कै शिवाली सुरेश पडवळ हिच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त पडवळ कुटुंबीयांनी निराधारांचे आश्रयस्थान असलेल्या पणदूर येथील संविता आश्रमला ५१००० रुपयाच्या देणगीसह जीवनावश्यक वस्तू प्रदान केल्या. कै शिवालीचे वडील सुरेश पडवळ यांनी संविता आश्रमचे संस्थापक संदीप परब यांच्याकडे ही देणगी आणि जिवनावश्यक वस्तू सुपूर्त केल्या. याबद्दल संदीप परब यांनी कै शिवालीचे वडील सुरेश पडवळ यांचे आभार मानले.कै शिवाली ही भारतीय स्टेट बँकेच्या सावंतवाडी शाखेच्या विशेष सहाय्यक पदावर असताना तिचे गेल्यावर्षी आकस्मित निधन झाले. डेगवे सार्वजानिक नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यात ती नेहमी अग्रस्थानी असायची. तिच्या स्मृती कायमची चिरंतर राहण्यासाठी वडील सुरेश पडवळ यांनी या मंडळाला गेल्या वर्षापासून नवदुर्गेची मूर्ती देण्यास सुरुवात केली. तसेच कै शिवालीने ज्या शाळा व कॉलेजमध्ये शिक्षण घेतले त्या ठिकाणी तिच्या स्मृती प्रित्यर्थ गुणवंत विद्यार्थ्यांसाठी खास बक्षीस योजनाही सुरू केली. सुरेश पडवळ यांनी आपली पत्नी कै सुमंगला आणि मुलगी कै शिवाली हिच्या स्मरणार्थ डेगवे गावचे ग्रामदैवत माऊली मंदिर येथे सुमारे ९ लाख रुपये खर्च करून दोन आकर्षक प्रवेशद्वार बांधून दिले. तसेच डेगवे शाळा नं १ मधील २ मुली दत्तक पालक योजनेंतर्गत २ मुली दत्तक घेतल्या.









