पालकमंत्री सतीश जारकीहोळींनी दिली माहिती
बेळगाव : रविवारी बेळगाव भेटीवर आलेल्या पूर्वआफ्रिकेच्या रवांडाच्या हायकमिशनर जॅक्वेलिन मुकनजिरा यांनी सुवर्ण विधानसौधला भेट देऊन पाहणी केली. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. जॅक्वेलिन यांनी विधानसभा व विधानपरिषदेचे सभागृह, सेंट्रल सभागृह, मंत्रिमंडळ बैठकीसाठीच्या सभागृहाची पाहणी केली. दोन्ही सभागृहांचे कामकाज व सुवर्ण विधानसौधमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाविषयी त्यांनी माहिती घेतली. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम खात्याचे उत्तर विभागाचे मुख्य अभियंते एच. सुरेश, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, कार्यकारी अभियंते एस. सोबरद, साहाय्यक कार्यकारी अभियंते प्रवीण हुलगी व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.