जयपूर
राजस्थानच्या जयपूरमध्ये एका खासगी रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये बिबट्या शिरल्याची घटना घडली आहे. या घटनेवेळी सुदैवाने वॉर्डमध्ये कुठलाच रुग्ण नव्हता, परंतु अन्य वॉर्ड्समध्ये रुग्ण दाखल होते. बिबट्या रुग्णालयात शिरल्याची माहिती कळताच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. रुग्णालय प्रशासनाने त्वरित याची माहिती पोलीस आणि वन विभागाला दिली.









