हिंडलगा / (वार्ताहर )
सार्वजनिक शिक्षण खाते व जिल्हा पंचायत बेळगाव यांच्यावतीने उचगाव विभागीय स्तरावर घेण्यात आलेल्या प्राथमिक शाळांच्या क्रीडा स्पर्धेत मण्णूर येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेच्या मुलींच्या कबड्डी संघाने अजिंक्यपद पटकाविले. बेळगाव तालुकास्तरीय स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे.
या स्पर्धा बेनकनहळ्ळी प्राथमिक शाळेच्या पटांगणावर झाल्या. विजयी संघाला मुख्याध्यापिका एस.एस.नाईक, क्रीडाशिक्षक एल.एस.गौडर, इतर शिक्षक वृंद, शाळा विकास व्यवस्थापन समिती, कोच महेश शिवणगेकर यांचे मार्गदर्शन लाभले.









