खेड /प्रतिनिधी
मुंबई -गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडी घाटातील दुसरा बोगदाही गुरुवारपासून वाहतुकीसाठी खुला झाल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळाला. बोगद्यामुळे ४५ मिनिटांचे अंतर अवघ्या आठ मिनिटातच पार करता येणार असल्याने चाकरमान्यांच्या वेळेची बचत होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून दोन्ही बोगद्याच्या दोन्ही बाजूला आवश्यक ती यंत्रसामुग्री तैनात सुसज्जता ठेवण्यात आली असल्याचे राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितले. कशेडी येथील महामार्ग वाहतूक पोलीस केंद्राकडूनही बोगद्याच्या प्रवेशद्वाजवळील काही अंतरापासून तालुक्यातील खवटी व पोलादपूर हद्दीतील भोगाव येथे पोलीस कर्मचारी तैनात करून गस्त ठेवण्यात आली आहे.
Previous Articleजांबोटी-खानापूर वाहतूक अर्धा दिवस ठप्प
Next Article ब्याकुड येथील शेतामधून चंदनाच्या झाडांची चोरी








