वृत्तसंस्था /नवी दिल्ली
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनतर्फे मांजेरी येथे आयोजिलेल्या केरळ मुख्यमंत्री पूरग्रस्त निधीसाठी आयोजिलेल्या प्रदर्शनीय फुटबॉल सामन्यात मोहमेडन स्पोर्टिंग क्लबने केरळ स्टार इलेव्हन संघाचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
या सामन्यात 21 व्या मिनीटाला मोहमेडनचे खाते लालरेमसेंगाने उघडले. त्यानंतर केरळ स्टार इलेव्हन संघाचा गोल बेलफोर्टने केला. सामन्याच्या उत्तराधार्थ मोहमेडन संघातील घानाचा फुटबॉलपटू मोहमद कद्रीने दुसरा आणि निर्णायक गोल केला.









