वृत्तसंस्था/ अमृतसर
पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरलेली कुस्तीपटू विनेश फोगट शनिवारी पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात पोहोचली. येथे शेतकरी नेत्यांनी त्यांचा व्यासपीठावर सत्कार केला. शेतकरी आंदोलनाला 200 दिवस पूर्ण झाल्याबद्दल येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आपण शेतकरी कुटुंबातील असल्याची जाणीव बोलून दाखवतानाच तिने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. ‘आज मी फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणार आहे, राजकारणावर बोलणार नाही. मी सुद्धा शेतकरी कुटुंबातील आहे. मला शेतकऱ्यांना समस्यांची जाणीव आहे. खेळाडू होण्यापूर्वी मी शेतातही काम केले आहे’ असे तिने सांगितले.









