तुम्ही मोगलीची कहाणी अवश्य ऐकली असेल, ज्यात जंगलात राहणारा मुलगा काही माणसांना आढळतो, परंतु एका मुलासोबत याच्या उलट घडले आहे. हा मुलगा जंगलातच राहिला, परंतु नशीबात काही दुसरेच लिहिले होते. रवांडाच्या जंगलात प्राण्यांसोबत राहण्यासाठी स्वत:च्या घरातून पळालेल्या युवकाच्या कहाणीचा सुखद अंत झाला. जांजीमन एलीला खऱ्या जीवनातील मोगली म्हटले जाते. याच्या चेहऱ्यामुळे त्याला जंगलात पिटाळण्यात आले होते. तसेच याला माकडही संबोधिण्यात आले होते. प्रत्यक्षात त्याला एक आजार होता. जांजीमनला खऱ्या जीवनातील मोगली म्हणण्यामागील कारण 2021 मध्ये युट्यूबवर त्याच्या जीवनाविषयी प्रसारित एक माहितीपट होता. क्लासिक डिस्ने चित्रपट द जंगल बुकमध्ये प्राण्यांच्या सान्निध्यात वाढलेला मुलगा मोगलीच्या कहाणीशी तुलना करण्यात आल्याने युवकाला हे नाव मिळाले. जांजीमनला घरातून पळून जाण्यासाठी भाग पाडण्यात आले होते, कारण क्रूर गुंडांनी त्याच्या चेहऱ्यामुळे त्याचे जीवन अत्यंत वेदनादायी करून सोडले होते.
जांजीमन हा मायक्रोसेफली नावाच्या आजाराने पीडित असून यात एक मुलगा सामान्यापेक्षा अत्यंत मोठ्या आकाराच्या शिरासोबत जन्माला येतो. परंतु एका चित्रपटाच्या टीमने त्याच्यावर माहितीपट तयार केल्यावर तो स्वत:च्या परिवाराला भेटू शकला होता. जांजीमन आता 25 वर्षांचा असून त्याचा जन्म 1999 मधील असल्याचे बोलले जाते. माहितीपट निर्माते आफ्रिमॅक्स टीव्हीने एक ‘गोफंडमी’ पेज तयार केले असून यावर जगभरातून देणगी प्राप्त झाली आहे. यामुळे जांजीमन आणि त्याच्या आईला एकत्र एक नवे जीवन जगण्याची संधी मिळाली आहे. 2022 च्या फुटेजमध्ये एलीला एका शाळेत जाताना पाहिले जाऊ शकते. तो स्वत:च्या आईसोबत घरात आनंदाने जगत आहे. त्याच्यातील अविश्वसनीय बदल एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसल्याचे त्याच्या आईचे सांगणे आहे. जांजीमन आता बाइक चालविणे देखील शिकला आहे.









