अमन सुणगारची सुवर्ण कामगिरी
बेळगाव : ओडिशा येथील भुवनेश्वर येथे 40 व्या सबज्युनिअर व 50 व्या ज्युनिअर राष्ट्रीय अॅक्वेटिक जलतरण स्पर्धेत बेळगावचा उगवता जलतरणपटू अमन सुणगार याने कर्नाटक संघातून खेळताना 4×100 मी. रिले स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले आहे. अमन सुणगार हा सेंट पॉल्स स्कूलचा विद्यार्थी आहे. अमन सुणगारने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत केलेल्या उत्तम कामगिरीची दखल घेवून कर्नाटक रिले संघात त्याला स्थान देण्यात आले होते. या संघाने अंतिम फेरीत धडक मारीत सुवर्णपदक पटकाविले. त्यामध्ये अमनचा सिंहाचा वाटा आहे. त्याला जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतीकर, इम्रान उचगावकर, विनायक आंबेवाडीकर यांचे मार्गदर्शन तर वडील अभिजित सुणगार व आई वसुंधरा सुणगार यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









