पाटण तालुक्यातील हुंबरळी गावाचे २१ जुलै २०२१ रोजी ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने भूस्खलन होऊन संपूर्ण गाव बाधित होऊनही गावाला कायमस्वरूपी पुनर्वसना पासून गेले तीन वर्ष वंचित राहावे लागले होते. याबाबत आज जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी एका महिन्यात सर्व गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू सदर गावच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाची जबाबदारी शासनाची आहे असे सांगितले, जिल्हाधिकारी दूडी यांनी गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न तात्काळ सोडविल्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे, पाटण तहसीलदार अनंत गुरव, गावचे अध्यक्ष नरेश देसाई व ग्रामस्थ उपस्थित होते.
२०२१ ला झालेल्या भूस्खलनमध्ये हुंबरळी गावाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये तीन घरे जमीनदोस्त झाली होती तर संपूर्ण गाव बाधित झाले असताना हुंबरळी गावातील फकत पाच घरांचे पुनर्वसन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. उर्वरित गावाला वगळण्यात आले होते. याबाबत ग्रामस्थांच्या वतीने तीन वर्षे प्रयत्न करण्यात येत होते त्याला यश येत नव्हते म्हणून १५ अगस्त २०२४ रोजी बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले होते त्यावेळी उपविभागीय अधिकारी टोपे, तहसीलदार अनंत गुरव यांनी विनंती करून उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली करून जिल्हाधिकारी यांचे सोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार आज जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक झाली त्यामध्ये जिल्हाधिकारी दुदी यांनी हुंबरळी गावातील २२७ कुटुंबाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याबाबत एक महिन्यात तत्काल निर्णय घेण्याचे मान्य केले, डूडी यांच्यासमवेत आज घेतलेल्या निर्णयाचे हुंबरळी ग्रामस्थ स्वागत केले असून असे कार्यतत्पर जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्याला मिळाले आहेत हे जिल्ह्याचे भाग्य आहे.
या बैठकीला हुंबरळी सरपंच रेश्मा कांबळे, रवींद्र देसाई, टी एल देसाई, बाजीराव देसाई, गणेश देसाई, भरत देसाई, बी के देसाई, लक्ष्मण देसाई, सीताराम देसाई, गोविंद चाळके, महेद्र देसाई,वाल्मीक देसाई, संजय देसाई, शिवाजी देसाई, विनायक देसाई आदी प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.