जपानी शिष्या कैवल्या उत्तराधिकारी
वृत्तसंस्था/ देहराडून
श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे ज्येष्ठ महामंडलेश्वर ब्रह्मलीन महायोगी पायलटबाबांच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. पायलटबाबांच्या जपानमधील शिष्या योगमाता साध्वी कैवल्यादेवी (केको इकोवा) यांना त्यांची उत्तराधिकारी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच त्यांना पायलटबाबा आश्र्रम ट्रस्टच्या अध्यक्षाही बनवण्यात आले आहे. महामंडलेश्वर साध्वी चेतनानंद गिरी आणि साध्वी श्र्रद्धा गिरी यांच्या अन्य दोन शिष्यांना ट्रस्टच्या सरचिटणीस बनवण्यात आले आहे. जुना आखाड्याचे महंत आणि संतांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत ही घोषणा केली.
पायलटबाबा अफाट संपत्तीचे मालक होते. रशिया, युव्रेन आणि जपानमध्ये त्यांचे सर्वाधिक अनुयायी आहेत. पायलटबाबांचे देशातील बिहार, नैनिताल, हरिद्वार, उत्तरकाशी, गंगोत्री आदी ठिकाणी आश्र्रम आहेत. हरिद्वार येथे पायलटबाबांच्या आश्र्रमात अनेक कामे पूर्णत्वास नेण्यात आली आहेत. त्यापैकी सर्वात विशेष बाब म्हणजे पायलटबाबांच्या आश्र्रमात सुमारे एक कोटी ऊपये खर्चून केवळ शौचालय बांधण्यात आले आहे. युव्रेन, रशिया, जर्मनी आदी देशांतून अनेक भाविक पायलट बाबांच्या हरिद्वार येथील आश्र्रमात रात्रंदिवस सेवा करण्यासाठी येतात.
पायलटबाबांचा जन्म बिहारमधील रोहतास जिह्यातील सासाराम येथील राजपूत कुटुंबात झाला. त्यांचे जुने नाव कपिल सिंग होते. काशी हिंदू विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांची भारतीय हवाई दलात निवड झाली. बाबा येथे विंग कमांडर पदावर होते. बाबांनी 1962, 1965 आणि 1971 च्या युद्धात सेवा बजावली आहे. त्याबद्दल त्यांचा गौरवही करण्यात आला होता.









